Corona Virus कोरोना व्हायरस म्हणजे नक्की काय ? कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो ? त्याची लक्षणे व उपचार काय आहेत ?

Corona Virus कोरोना व्हायरस म्हणजे काय ? व्हायरसचा एक मोठा गट कोरोना आहे जो प्राण्यांमध्ये सामान्यतः आढळतो. अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशन (सीडीएस) च्या मते, कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचतो. सार्स विषाणूंप्रमाणे आता नवीन चिनी कोरोनो विषाणूला शेकडो संक्रमण झाले आहे. यापूर्वी हा विषाणू डीकोड करणार्‍या हॉंगकॉंग युनिव्हर्सिटीच्या Read more

Meghalaya Basin Management Agency (MBMA) Visited to Mhaswandi

मेघालय राज्याचे सामाजिक, आर्थिक तथा प्रशासकीय पॉलिसी बनवण्यास मदत करणारी मेघालय शासनाची Meghalaya Basin Management Agency (MBMA) ही संस्था आणि या संस्थेच्या वतीने Watershed management तथा Women Empowerment & Sustainable Rural Development या विषयाचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यीय प्रतिनिधिंनी आज म्हसवंडी गावाला भेट दिली. म्हसवंडी गावचे पाणलोट मॉडेल आमच्यासारख्या पूर्वांचल Read more

छत्तीसगढ राज्यातील कोरिया जिल्ह्याच्या मुख्य सी ई ओ ची म्हसवंडी भेट

छत्तीसगढ राज्यातील कोरिया जिल्ह्याच्या मुख्य सी ई ओ यांनी आपल्या प्रशासकीय टिपसह म्हसवंडीला भेट दिली. पाणलोट प्रकल्पाचा (Watershed Management)अभ्यास करण्यासाठी खास नऊ सदस्यीय टीम छत्तीसगढ सरकारच्या वतीने आली होती. यावेळी पाणलोट प्रकल्पासोबतच गावाने केलेल्या इतर गोष्टीची माहिती घेतली. सर्व गोष्टी पाहून सर्वांनी भारावून गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वांचे गावकऱ्यांच्या वतीने Read more

वॉटरचे प्रणेते फादर हरमन बाकर यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून साजरा.

फादर हरमन बाकर ( Father Hermann Bacher )….! वॉटर ( WOTR- Watershed Organisation Trust ) संस्थेचे संस्थापक तथा भारत सरकारच्या इंडो-जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्रणेते. आज त्यांचा 95वा वाढदिवस…! म्हसवंडी गावचा कायापालट होण्यामागे या व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे. स्विझरलँड सारख्या जगाचा स्वर्ग असनाऱ्या देशात अतिशय चांगल्या कुटुंबात जन्मलेल हे व्यक्तिमत्व. ऐनतारुण्य Read more

म्हसवंडी – नीलिमा जोरवर

प्रसिद्ध लेखिका, जर्नलिस्ट तथा ग्रामीण भागातील विविध महत्वपूर्ण गोष्टींवर अभ्यास करून जगासमोर मांडणाऱ्या निलिमा जोरवर यांनी काही दिवसांपूर्वी म्हसवंडी गावाला भेट दिली होती. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांपैकी बखर रानभाज्यांची, प्रवास ग्रामीण जीवनाचा यांसारख्या अनेक पुस्तकांना अनेक ठिकाणी गौरविण्यात आले आहे. वॉटर संस्थेद्वारे प्रकाशित ग्रामीण भागातल्या उल्लेखनीय कामगिरी Read more

म्हसवंडीच्या आरतीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

हमारी छोरियां छोरों से कम नहीं है…! म्हसवंडीच्या आरतीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. पुणे विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत म्हसवंडीच्या आरती सोपान बोडके हिने राज्यात सुवर्णपदक मिळवले. पुणे ग्रामीण या विभागाचे प्रतिनिधित्व करत असताना ती राज्यात अव्वल ठरली आणि येत्या नोव्हेंबर महिन्यात हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिची निवड Read more

अहमदनगर जिल्ह्याचे नंदनवन काश्मिर…म्हसवंडी…!

      संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी परिसर म्हणजे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या कुशीत, दोन जिल्हे ( पुणे, अहमदनगर ) आणि तीन तालुक्यांच्या ( संगमनेर, जुन्नर, अकोले ) सरहद्दीवर वसलेले, तीनशे उंबरठा असणारं म्हसवंडी हे छोटंसं गाव. आज एक विकसनशील गाव म्हणून संगमनेर तालुक्‍यातील म्हसवंडीची ओळख आहे. Read more

पुरग्रस्थांना मदत…अनेक हात मदतीचे ….!!

अनेक हात मदतीचे ….!! सांगली , कोल्हापूर पुरग्रस्थांना मदत म्हणून गहु बाजरी तांदूळ घरोघरी जावून जमा केले . एकता फाउंडेशन च्या सदस्यांनी म्हसवंडीतील प्रत्येक घरातुन फुल ना फुलाची पाकळी मदत स्वरूपात जमा केली . ग्रामस्थांनी देखील मागेपुढे न बघता भरगोस मदत आपल्या बांधवांसाठी केली . उद्या जमा झालेले धान्य सांगलीला Read more

वृक्षारोपण आणि संवर्धन वर्ष ६ वे.

#वृक्षारोपण_आणि_संवर्धन_वर्ष ६ वे. सालाबादप्रमाणे याही वर्षी एकता फाऊंडेशन आयोजित वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम आज घेण्यात आला. यावर्षी रस्त्याच्या कडेला झाडे न लावता जागा बदलून उन्हाळ्यामध्ये पानी फौंडेशन स्पर्धेदरम्यान डोंगर माथ्यावर तयार केलेल्या CCT च्या मातीच्या बांधावर ही वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन ५०० रोपांची लागवड केली. यामध्ये वड, Read more

वाॅटरकप स्पर्धा २०१९- म्हसवंडी तालुक्यात चतुर्थ.

पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धा २०१९ हि एप्रिल आणि मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज पार पडला. यावर्षी ७६ तालुक्यातील ४७०० गावांनी सहभाग घेतला त्यातून सोलापूर जिल्ह्यातील, बार्शी तालुक्यातील, सुर्डी हे गाव राज्यात प्रथम आले. सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन…! संगमनेर Read more